
कॅब चालकाचे कारमधील तरुणीसोबत असभ्य वर्तन
तरुणीने सोशल मिडियावर सांगितला भयानक अनुभव, म्हणाली, मी झोपल्यानंतर तो......
दिल्ली – मुंबईतील एका तरुणीसोबत दिल्लीत दोन कॅब ड्रायव्हरनी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी समयसुचकता दाखवल्यामुळे तिचा जीव वाचला. यामुळे महिला सुरक्षा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबईतील रुचिका लोहिया नावाच्या एका महिलेने अलीकडेच इंस्टाग्रामवर दिल्लीच्या प्रवासादरम्यान कॅब ड्रायव्हर्सशी झालेल्या दोन अस्वस्थ करणाऱ्या घटनाची माहिती दिली आहे. तिच्यासोबत पहिली घटना दिल्लीत पहिले पाऊल ठेवली असताच घडली आहे. दिल्ली विमानतळावर तिने इच्छित स्थळी जाण्यासाठी रॅपीडो बुक केली होती. तिने ड्रायव्हरला एअर कंडिशनिंग चालू करण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि तिला सांगितले, “माझ्या इच्छेनुसार ते चालू केले जाईल. जर तुम्हाला एसीची इतकीच गरज असेल तर दुसरी कॅब बुक करा, असे उद्धट उत्तर दिले. त्यानंतर तिने उबर बुक केल्यानंतर तिला जास्तच वाईट अनुभव आला. कॅबमध्ये ती झोपली असता ड्रायव्हर तिचा व्हिडिओ शुट करत होता. सुरुवातीला तिला भास झाल्यासारख वाटलं. पण काही क्षणांनंतर, तिला समजले की तो प्रत्यक्षात तिचे शुटींग करत आहे. घाबरून, तिने पटकन तिच्या बहिणीला याची माहिती दिली. आणि दुसरे काम करायचे आहे, असे सांगून स्व:तची सुटका करुन घेतली. हा अनुभव तिने सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून ड्रायव्हरवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
रॅपोडो आणि उबर या दोन्ही कंपनींनी तरुणीची माफी मागितली असून नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि राईड आयडी दिल्यास संबंधित चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.