
धक्कादायक! चालत्या ट्रेनमधून तरुणी झाली गायब
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती आठवड्यापासून बेपत्ता, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान, काय घडले?
*मुख्य – धक्कादायक! चालत्या ट्रेनमधून तरुणी गायब*
*सब- जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती आठवड्यापासून बेपत्ता, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान*
इंदूर – सिव्हिल जजची तयारी करणारी एक तरुणी अचानक गायब झाली आहे. इंदूर येथील ही तरुणी चालत्या ट्रेनमधून बेपत्ता झाली आहे. अद्याप तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे अर्चना गेली कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अर्चना तिवारी असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात राहणारी अर्चना इंदूरच्या उपकार गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहून सिव्हिल जजची परीक्षा तयारी करत होती. अर्चना रक्षाबंधन करून कटनीवरून ट्रेनमधून परतत होती. अर्चना घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली की एक आठवड्यानंतरही तिच्या बेपत्ता होण्याचं रहस्य कायम आहे. तिचा मोबाइलही स्विच ऑफ लागत आहे. चालत्या ट्रेनमधून ती कुठे गेली, ती कुणासोबत मर्जीने गेली की तिला कुणी जबरदस्ती घेऊन गेले? एखाद्या गंभीर संकटात ती सापडली नाही ना यासारखे विविध प्रश्न तिच्या बेपत्ता होण्याने समोर आले आहेत. अर्चनाचे वडील बाबू प्रकाश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. तिने जबलपूर येथून एलएलएम केले. त्यानंतर तिने जबलपूर उच्च न्यायालयात तीन वर्षे प्रॅक्टिस केली. गेल्या आठ महिन्यांपासून ती इंदूरमध्ये राहत होती आणि सिव्हिल जजच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेत होती.
अर्चना बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबाने कटनी जीआरपी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सध्या पोलिस तिचा शोध घेत आहेत. अर्चनाचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआर याच्या मदतीने शोध घेतला जात आहे.