Latest Marathi News
Ganesh J GIF

डाॅक्टर पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या

या कारणामुळे पतीने केली पत्नीची हत्या, सासू सासरे यांनीही केली मदत, हत्या करुन अपघात दाखवला पण...

बेळगाव – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा संतप्त घटनाक्रम समोर येत असल्यामुळे समाजाच्या सगळ्याच स्तरांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता कर्नाटकातील बेळगावमध्येही तशीच घटना घडलेली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

एका डाॅक्टर महिलेला मूल होत नसल्यामुळे सासरच्या लोकांनी निर्घुण हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. डॉ. रेणुका संतोष होनकांडे असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. मूल होत नसल्यामुळे रेणुकाला तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी आधी गळा दाबून ठार केलं आणि त्यानंतर तिचा अपघाती मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी तिचा मृतदेह बाईकला बांधला आणि तो फरपटत नेला. महाराष्ट्रातील सातारा येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या संतोषचा २०२० मध्ये रेणुकासोबत विवाह झाला होता. रेणुका ही डॉक्टर होती. जरी हे जोडपे सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होते, तरी त्यांचे वैवाहिक जीवन सुरुवातीपासूनच अडचणीचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते वेगळे राहत होते. त्यातच रेणुका आई होऊ शकत नाही ही बाब तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या मंडळींना कळली होती. त्यानंतर तिला तू घर सोडून तुझ्या माहेरी जा असं तिला सांगण्यात आलं. मात्र रेणुका त्याच घरात वास्तव्य करत होती. त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिच्या हत्येचा कट रचला. जयश्रीने पीडित डॉ. रेणुका संतोष होनकांडे यांना चालत्या गाडीतून ढकलले, नंतर दगडाने हल्ला केला, नंतर कामनाने त्यांचा गळा दाबला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती समोर आली. सासरच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि १०० मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ओढून नेले जेणेकरून तिचा साडी दुचाकीच्या चाकात अडकल्यामुळे अपघात झाला असे भासेल. विशेष म्हणजे रेणुकाचा नवरा संतोष होनकांडे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं, जी आता गरोदर आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात रेणुकाचा नवरा संतोष, त्याचे वडील कामण्णा आणि आई जयश्री या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी खून आणि हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही सध्या हिंडलगा तुरुंगात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!