Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठी माणसाला धमकवणा-या परप्रांतीयाला मनसे चोप

महिलांसमोर करायचा अश्लील चाळे, फ्लॅट बळकवण्याचा प्रयत्न, चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

नाशिक – नाशिकच्या पंचवटी परिसरातील एका इमारतीत परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक रहिवाशांवर दादागिरी, असभ्य वर्तन आणि त्रास दिल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला मनसेने चोप देत चांगलाच इंगा दाखवला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख त्रिपाठी नावाच्या परप्रांतीय व्यक्ती म्हणून झाली असून, त्याच्या मालकीचे एकाच इमारतीत सात फ्लॅट आहेत. विशेष म्हणजे, याच निवासी इमारतीत त्याने ‘अलोक सिक्युरिटी सर्व्हिसेस’ या नावाने व्यावसायिक कार्यालय सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, त्रिपाठीने इमारतीतील अन्य फ्लॅटधारकांना त्रास देऊन त्यांचे फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण इमारतीत भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. तो इतर फ्लॅटधारकांना फ्लॅट् मला विका नाहीतर मी जीवन जगणं हराम करीन अशी धमकी देत होता. तो फ्लॅटसमोर लघुशका करणे, अंतरवस्त्र, बनियनवर फ्लॅट्स समोर फिरून त्रास द्यायचा तसेच काही दिवसांपूर्वी गळ्यावरील ओढणी हिसकावून मारण्याचाही त्याने प्रयत्न केला. या तरुणाच्या त्रासाला कंटाळून मराठी महिलेने मनसेकडे धाव घेतली. यानंतर मनसेचे पदाधिकारी त्रिपाठीला समजवण्यासाठी गेले असता, त्रिपाठीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली त्याने अश्लील भाषेत वर्तन केले. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. यानंतर त्रिपाठीने सिक्युरिटी एजन्सीचे बाऊन्सर्स बोलावून नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस तातडीने दाखल झाले आणि त्यांनी बाऊन्सरसह संबंधित परप्रांतीयाला ताब्यात घेतले.

स्थानिक नागरिकांची माफी मागितल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये व्यावसायिक कार्यालय परवानगीशिवाय सुरू कसे केले गेले? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!