
आर्मी जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून जबर मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी, काठी आणि वीटेने मारहाण
मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठमधून भारतीय लष्कराच्या एका जवानासोबतच्या क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील टोल प्लाझावर कपिल नावाच्या एका सैनिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कपिल कवाड हे सैनिक असून ते भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. कवाड सुट्टीवर घरी आले होते आणि दिल्ली विमानतळावरून श्रीनगरमधील आपल्या पोस्टवर जाण्यासाठी निघाला होते. कपिल आणि त्यांचे चुलत भाऊ भुनी टोल नाक्यावर वाहतुक कोंडीत अडकले होते. फ्लाइटला उशीर होईल या काळजीपोटी कपिल गाडीतून खाली उतरले आणि टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांशी बोलू लागला. तेव्हा टोल आणि टोल शुल्कावरील जामवरून त्यांचा टोल कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. प्रकरण इतके वाढले की टोल कर्मचाऱ्यांनी लष्करी जवानाला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये जवानाला लाथा, ठोसे आणि काठ्यांनी मारहाण करत असल्याचे आल्याचे दिसून येते. नंतर खांबाला बांधत मारहाण करण्यात आली. एका टोल कर्मचाऱ्याने त्याला मारण्यासाठी वीटही उचलली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल हा भारतीय लष्करात कार्यरत आहे. तो आपल्या पोस्टवर परत जात होता, त्यावेळी हा वाद झाला.
कपीलच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सरूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओ तपासल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके कार्यरत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.