
शिवसेनेच्या माजी आमदाराचा महिलेवर लैंगिक अत्याचार
विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी, माजी आमदाराविरोधात गुन्हा दाखल, दिवसभर फिरवले आणि...
बंगरुळू – उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे माजी आमदार भगवान शर्मा उर्फ गुड्डू पंडित यांच्याविरोधात महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दोन वेळा आमदार राहिलेले भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला आपल्या अल्पवयीन मुलासह १४ ऑगस्ट रोजी गुड्डू पंडित यांच्या सांगण्यावरून उत्तर प्रदेशातून बेंगळुरू येथे आली होती. त्याच दिवशी माजी आमदाराने तिला शहरातील अनेक ठिकाणी फिरवले. यानंतर १६ ऑगस्ट रोजी ते चित्रदुर्ग येथे गेले आणि परतीच्या प्रवासात १७ ऑगस्ट रोजी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या महिलेने विरोध केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने सांगितले आहे. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आमदार भगवान शर्मा यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. तसेच, त्यांच्या प्रतिनिधींनीही या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.
संबंधित महिला २०१७ पासून शर्मासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. या जोडप्याला ७ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, कायदेशीररित्या त्यांचं अद्याप लग्न झालेले नाही. दरम्यान पोलीस अधिक तपास करत आहेत.