
पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
मुस्कान प्रकरणाची पुनरावृत्ती, पतीचा मृतदेह ड्रममध्ये लपवला, सुनिताचा धक्कादाक कट
अलवर – किशनगड परिसरात निळ्या ड्रममध्ये सापडलेल्या हंसराज उर्फ सूरजच्या हत्येचं रहस्य पोलिसांनी सोडवले आहे. या प्रकरणात आरोपी प्रियकर जितेंद्र शर्मा आणि मृत हंसराजची पत्नी लक्ष्मीला अटक करण्यात आली आहे.
राजस्थानच्या अलवर येथील किशनगड परिसरातील आदर्श नगर कॉलनीत निळ्या रंगाच्या ड्रममध्ये पोलिसांना मृतदेह सापडला. या प्रकरणाचा पोलीस तपासात खुलासा झाला असून मृत हंसराजची पत्नी लक्ष्मीदेवी आणि तिचा प्रियकर जितेंद्र शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचा आठ वर्षांचा मुलगा या प्रकरणात प्रमुख साक्षीदार म्हणून समोर आला आहे. पाणी साठवण्यासाठी वापरला जाणारा निळा ड्रम त्याच्या आईने आणि तिच्या कथित प्रियकराने त्याच्या वडिलांचा मृतदेह लपवण्यासाठी वापरल्याची माहिती या मुलाने दिल्याचे पोलिसांन स्पष्ट केले. मुलाने सांगितले की, घटनेच्या रात्री त्याचे आई-वडील आणि जितेंद्र नावाचा व्यक्ती घरात एकत्र दारू पित होते. दारूच्या नशेत हंसरामने पत्नी सुनीताला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद विकोपाला गेला. त्यात जितेंद्रने हस्तक्षेप करत हंसरामला आडवे येण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री तो अचानक जागा झाला असता त्याने आपल्या वडिलांना बेडवर निश्चल अवस्थेत पाहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पाहिले की आई आणि जितेंद्र मिळून वडिलांचा मृतदेह जवळ ठेवून उभे होते. त्यावेळी त्यांनी घरातील पाण्याने भरलेला मोठा ड्रम रिकामा केला, मृतदेह आत ठेवला, त्यावर मीठ टाकले आणि तो ड्रम छतावर नेऊन ठेवला. दरम्यान हंसराम उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी होता. हंसराम गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या पत्नी सुनीता आणि तीन मुलांसह किशनगड बास परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होता. तो स्थानिक वीटभट्टीवर मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
पोलिसांनी हंसरामची पत्नी सुनीता आणि तिचा प्रियकर जितेंद्र या दोघांना अटक केली आहे. घटना उघड झाल्यानंतर ते दोघेही तिन्ही मुलांसह दुसऱ्या एका वीटभट्टीवर लपून बसले होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण राजस्थानात खळबळ उडाली आहे.