
ट्रेनमधून बेपत्ता झालेल्या अर्चना सापडली पण….
अर्चना प्रकरणाला धक्कादायक वळण, नेमकं प्रकरण काय? हा पोलीस तिला नेपाळमध्ये घेऊन गेला आणि....
लखनऊ – मध्यप्रदेशमधून धावत्या रेल्वेतून गायब झालेली महिला वकील अर्चना तिवारी हिचा अखेर १२ दिवसांनी शोध लागला आहे. भोपाळ पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथून ताब्यात घेतले आहे. अर्चना नेपाळ सीमेजवळ पोहोचली कशी याची चौकशी सुरू आहे.
अर्चना हिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ग्वाल्हेर येथून कॉन्स्टेबल राम तोमर याला ताब्यात घेतले आहे. राम तोमरने अर्चनाच्या इंदूर ते ग्वाल्हेर या प्रवासासाठी तिकीट बुक केल्याचे उघड झाले होते. अर्चना बऱ्याच दिवसापासून राम तोमरच्या संपर्कात होती. राम तोमर ग्वाल्हेरच्या भंवरपुरा पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे. कॉल रेकॉर्डनुसार या दोघांमध्ये खूपदा बोलणे व्हायचे. पोलिसांनी राम तोमरचा मोबाईल जप्त केला आहे. अर्चना तिवारी बेपत्ता होण्यामागे राम तोमरची भूमिका असू शकते असा संशय पोलिसांना आहे. नुकत्याच एका खून प्रकरणातून त्याची सुटका झाली असून, आता या नव्या प्रकरणात त्याच्यावर शंका व्यक्त केली जात आहे. सुरुवातीच्या चौकशीत राम तोमरने कबूल केले आहे की तो अर्चनाच्या संपर्कात होता. दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्कात आले होते. मात्र हा सूत्रांचा दावा असून, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे अर्चना तिवारीसोबत नेमकं झालं ? हे पोलीस तपासानंतरच समोर येईल. दरम्यान अर्चना तिवारी गायब झाल्यापासून ५ थेअरी समोर येत होत्या. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. अर्चना काठमांडूला फिरण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत इंदूरचा एक मुलगाही होता. अर्चनाने तिच्या आईला फोन करून ती सुरक्षित असल्याचे कळवले. पोलिसांनी कॉल लोकेशन शोधून तिचा शोध सुरू केला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील नेपाळ सीमेजवळून पोलिसांनी अर्चनाला ताब्यात घेतले आहे.
अर्चना तिवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात वकील म्हणून कार्यरत होती. ती सिव्हिल जज परीक्षेची तयारी करत होती. रक्षाबंधनासाठी ती नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीकडे रवाना निघाली होती. मात्र या प्रवासातच ती गायब झाली. तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन इटारसी स्टेशन दाखवत होते. त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला. अर्चना कटनीला पोहोचलीच नाही हे कळतात कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार भोपाळच्या राणी कमलापती जीआरपी ठाण्यात दाखल केली होती.