
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या
पाच व्हिडिओ शेअर सांगितली आपबीती, बेटा, मला फक्त तू हवा होतास म्हणत टोकाचा निर्णय, बीनाची आत्महत्या
भिवपुरी – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नवविवाहित महिलेने पाच व्हिडिओ बनवत ते इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या मुलांबद्दल भावना व्यक्त करत सासरच्या लोकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बीना यादव असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. बीना यादव ही सोमवारी तिच्या माहेरातून गायब झाली आणि यानंतर तिने पती आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून जीव देत असल्याचे इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे म्हटले आहे. भिवपुरीत पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात बीनाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तिने आपला मुलगा पतीजवळ न ठेवता तिच्या आईवडिलांकडे सोपविण्यास सांगितले आहे. पती आणि सासरच्यांना जबाबदार धरत बीनूने म्हटले आहे की, “त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, मला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यांनी मला येथेही नीट जगू दिले नाही. माझे पती, दीर सागर, ध्रुव, देवराज, विनोद आणि शिवनंदन, सासू, मोठी वहिनी आणि सासरे यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझा मुलगा त्याच्या आजी-आजोबांसोबत राहील, असे सांगताना तिने आपल्या मुलाबद्दल मात्र हळवी प्रतिक्रिया दिली आहे. आई तुला खूप प्रेम करते बेटा, तू माझं आयुष्य आहेस. आई फक्त तुलाच हवी होती, दुसऱ्या कोणाला नाही. मला हा हुंडा नकोय, ना दुसरं कोणी. जेव्हा तू माझ्या आयुष्यात नसशील तेव्हा मी असं जगून काय करणार? मी जगत होते, पण या लोकांनी मला जगण्याच्या लायकीच सोडली नाही.” त्यांनी मला चेहरा दाखवायलाही सोडलं नाही. तुझी आई तुला खूप प्रेम करते. असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान बीनाचा विवाह राजस्थानमधील प्रशांत यादवशी सुमारे पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना सम्राट यादव नावाचा तीन वर्षांचा मुलगा आहे, जो तिच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे ठेवला आहे, त्यामुळे बीना यादव प्रचंड तणावात होती.
मृत महिलेचा भाऊ सत्यवीर सिंह यादव यांनी आरोप केला आहे की, बीनूला तिच्या सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी मानसिक त्रास दिला जात होता. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू आहे.