Latest Marathi News
Ganesh J GIF

सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम सापडला पण….

गौतम गायकवाड बेपत्ता प्रकरणाला वेगळे वळण, त्या सीसीटीव्हीमुळे आणि कर्जामुळे वेगळाच संशय

पुणे- सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड हा युवक रविवारी सापडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पण या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता. कारण त्याच्यावर भरपूर कर्ज होते. सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाजी कडा येथून घसरून खोल दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवले होते. तेव्हापासून गौतमला शोधण्यासाठी सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन, हवेली पोलीस प्रशासन तपास घेत होते. गौतमला शोधत असताना रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने शोध घेतल्यावर गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासानुसार, गौतमवर सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते आणि त्याला वारंवार कर्जवसुलीसाठी फोन येत होते. यामुळे, गौतमने आपल्या मृत्यूचा बनाव केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अधिक चौकशीसाठी पोलीस गौतमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत.

गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील असून सध्या हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. हैदराबादहून तो आपल्या मित्रांसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी पुण्यातील सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!