
धक्कादायक! चार वर्षाच्या मुलाला विष देत पती पत्नीची आत्महत्या
तब्बल ३६ पानी सुसाईड नोट लिहीत घेतला गळफास, उद्योगपती परिवाराने या कारणामुळे केली आत्महत्या
शाहजहांपुर – कर्जाचा बोजा असह्य झाल्यामुळे शाहजहांपुर येथील एका हँडलूम व्यापाऱ्यांने पत्नी आणि लहान मुलाला विष देत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ३६ पाणी सुसाईड नोट लिहीत ही आत्महत्या करण्यात आली आहे.
सचिन ग्रोवर, त्यांची पत्नी शिवांगी ग्रोवर आणि चार वर्षाचा मुलगा फतेह अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा पानिपत या नावाने हँडलूमचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी एका सरकारी योजनेतून ५० लाखाचे कर्ज घेतले होते. त्यात त्यांना १७ लाखाचे सरकारी अनुदान मिळणार होते. पण अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना कर्जाचा हप्ता वेळेवर भरता येत नव्हता. यामुळे ते तणावात होते. त्याचबरोबर सरकारी अधिकारी अनुदान मंजूर करण्यावरून टाळाटाळ करत होते, त्यामुळे ग्रोवर कुटुंबीय चिंतेत होते. अखेर डोक्यावर वाढलेलं कर्ज, बिघडलेलं आर्थिक गणित यामुळे पती, पत्नीने कुटुंबच संपवण्याचा निर्णय घेतला. मुलाला विष देऊन मारल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. “माझी कुटुंबीयांबद्दल कोणतीही तक्रार नाही. सगळ्यांनी मला साथ दिली. आमची कार, घर आणि इतर वस्तू विका आणि माझ्यावरील सर्व कर्जाची परतफेड करा. जेणेकरून कुणीही असं म्हणून नये की आमचे पैसे देणे बाकी आहे”, असे सचिन ग्रोवरने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसाच्या प्राथमिक तपासानुसार पती-पत्नीने आधी मुलाला विष दिले. त्यानंतर ते वेगवेगळ्या खोलीमध्ये गेले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्रीच त्यांनी स्वतःला संपवले, असे पोलिसांनी सांगितले आहे.