
अजब! प्रियकर न आल्यामुळे त्याच्या मित्रांसोबत केले लग्न
श्रद्धा तिवारी बेपत्ता प्रकरणात मोठा ट्विस्ट, त्या व्हिडिओमुळे पोलिसही चकित, प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी घरातून पळाली, पण....
भोपाळ – मागील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय श्रद्धा तिवारी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. अखेर श्रद्धा इंदूरमधील एमआयजी पोलीस ठाण्यात पोहोचली. यावेळी तिने आपण लग्न करण्यासाठी घरातून पळून गेल्याचे संगीतके आहे. यामुळे तिच्या पालकांना धक्का बसला आहे.
गुजराती कॉलेजमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या श्रद्धा आठवड्यापूर्वी घरातून निघून गेली होती. ,ती तिचा बॉयफ्रेंड सार्थकसोबत ट्रेनने जाणार होती, पण सार्थक न आल्याने ती करणदीपला भेटली आणि त्यांनी महेश्वरमध्ये लग्न केले. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता श्रद्धा उर्फ आयुषी तिवारी कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. तिने तिचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती लोटस स्क्वेअरवरून विजय नगरकडे लाल टी-शर्ट आणि जीन्समध्ये जाताना दिसत होती. दुसऱ्या फुटेजमध्ये ती दुकानाजवळील एखाद्या व्यक्तीकडून बॅग घेऊन एका महिलेसोबत जातानाही दिसत होती. श्रद्धाने पोलिसांना सांगितले की, ती तिचा बॉयफ्रेंड सार्थकसोबत ट्रेनने जाणार होती, पण तो न आल्यामुळे ती रेल्वे स्टेशनवर करणदीपला भेटली. करणदीप हा कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. दोघांनी महेश्वर येथे जाऊन लग्न केले. तिच्या वडिलांनीही पोलिसांना सांगितले की, श्रद्धाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. तिच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी तिला जावरापर्यंत येण्यास सांगितले आणि तिला पैसे पाठवले. तेव्हाही करण आणि श्रद्धा एकत्र होते. श्रद्धाच्या वडिलांनीही तिच्या मानसिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “मी या लग्नाला मानत नाही, पण ती आता सज्ञान आहे, त्यामुळे ती जो निर्णय घेईल तो आम्ही स्वीकारू. माझी मुलगी मानसिकदृष्ट्या ठीक नाही. करणने मला सांगितले की ती त्याला रेल्वे स्टेशनवर भेटली आणि ती आत्महत्या करणार होती, तेव्हा त्याने तिला वाचवले, अशी माहिती दिली. पण श्रद्धाने आपल्या प्रियकराऐवजी त्याच्या मित्रांसोबत लग्न केल्यामुळे या संपूर्ण प्रकारावर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.
श्रद्धा आता तिच्या पतीसोबत इंदूरला परतली आहे, त्यामुळे पोलिस तिच्या बेपत्ता होण्याचा संपूर्ण घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिचा प्रियकर कोठे आहे. तिने अचानक लग्न का केले आणि गेल्या सात दिवसांत ती कुठे होती हे तपास अधिकारी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.