
भर रस्त्यात बाईक रायडर सोबत महिलेचा हायव्होल्टेज राडा
वादाचा व्हिडिओ व्हायरल, महिलेचा ड्रायव्हरवर अश्लील कृती केल्याचा आरोप, इतरांनाही सुनावले पण अचानक....
दिल्ली – दिल्लीत एका महिलेने बाइक ड्रायव्हरने आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत भर रस्त्यात धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यात महिला इतर पुरुषांबरोबर देखील वाद घातलं असल्याचे दिसून आले आहे.
एका महिलेने बाईक टॅक्सी बुक केली होती. पण रस्त्यात तिने गाडीचा ड्रायव्हर आपल्याशी अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप मदत खाली उतरते. महिला त्या तरुणाला म्हणाली, मी राईड कसं कॅन्सल करणार..आधी मी तक्रार करेन आणि रस्त्यात त्याच्याशी वाद घालू लागते. त्यामुळे इतर नागरिक त्या महिलेला जर तिच्यासोबत काही चुकीचं घडलं असेल, तर पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे. रस्त्यावर भांडण करणं आवश्यक नाही. त्यावर ती महिला मी याला आता मारणार असल्याचे सांगते, त्यावर कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही. त्यानंतर महिला म्हणते की, ड्रायव्हर पुन्हा पुन्हा ब्रेक मारत होता, जेणेकरून तिची छाती त्याला स्पर्श करेल. यावर तिला सर्वजण रस्त्यात वाद घळण्यापेक्षा पोलिसात तक्रार करा असा सल्ला देतात. त्यावर ती महिला तुमच्या सारख्या लोकांमुळे दिल्ली सेफ नाही, असा आरोप करते, त्यावेळी कॅब ड्रायव्हर देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ती महिला रस्त्यात आपला धिंगाणा चालूच ठेवते. अखेर एक महिला येऊन त्या वाद घालणाऱ्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करते. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिला विनाकारण वाद घालत असल्याचे सांगितले आहे, तर अनेकांनी महिलेची बाजू घेत ड्रायव्हरवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.