
महिलेच्या सततच्या बलात्काराच्या धमकीला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या
आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, 'त्या' सुसाईट नोटमुळे विवाहित इति अडचणीत, २३ लाख दिले, नेमके प्रकरण काय?
इंदोर – इंदोर शहरातील एका क्लबच्या मालकाने आत्महत्या केली आहे. शोभा क्लबचे मालक भूपेंद्र रघुवंशी यांचे एका महिलेकडून ब्लॅकमेलिंग केले जात होते. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये रघुवंशी यांनी संबंधित महिलेला जबाबदार ठरवत आत्महत्या करणार असल्याचे लिहिले होते. आता त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
इंदूर शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका क्लब व्यावसायिकानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. भूपेंद्र रघुवंशी असं शोभा क्लबच्या मालकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे एका विवाहित महिलेचा हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशीतील इंदूर येथील अन्नपूर्णा पोलिस स्टेशन परिसरात २६ ऑगस्टला व्यापारी भूपेंद्र रघुवंशी यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली होती. या घटनेत एक पाच पानी सुसाईड नोट देखील सापडली होती. सुसाईड नोटमध्ये भूपेंद्र रघुवंशी यांनी या इति तिवारी या महिलेवर आरोप केला होता की, आरोपी महिलेने त्यांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्याकडून २३ लाख रुपये घेतले होते. ब्लॅकमेल आणि मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची वेळ आल्याचे मद्य व्यावसायिक भूपेंद्र रघुवंशी यांनी सुसाईड नोटमध्ये सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार इति आणि भुपेंद्र यांची ओळख एका पीचर्स पब मध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीनंतर त्यांच्यात अनैतिक संबंधही निर्माण झाले. आणि त्याच आधारे इति भुपेंद्र यांना ब्लॅकमेल करू लागली. तिने सुरुवातीला महागड्या चैनीच्या वस्तू मागण्यास सुरुवात केली. पण नंतर तिच्या डिमांड वाढत गेल्या, मागील काही दिवसांपासून तिने भोपाळमध्ये घर घेऊन देण्याची मागणी केली होती, त्यामुळे भुपेंद्र तणावात होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला इंदूरमध्ये राहत होती. परंतु नंतर ती नोकरीसाठी मुंबईला शिफ्ट झाली. परंतू तिथे जाऊनही या महिलेने ब्लॅकमेलिंग थांबवलं नाही. पैसेच नाही तर तिने कार आणि फ्लॅटचीही मागणी करण्यास सुरवात केली, असा आरोप आहे. पोलिस अधिकारी दंडोटिया यांनी सांगितले की, आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत त्यात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही, पोलिस तपास करत आहेत.
तपास आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी इति तिवारीला अटक केली आणि तिला न्यायालयात हजर केले, जिथून तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी इतिचा मोबाईल आणि इतर जप्त केलेले डिजिटल उपकरणं सायबर फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहेत.