
नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाची गोळी झाडून घेत आत्महत्या
फोन, दागिने आणि महागड्या वस्तू देऊनही नर्तिका पूजाने या कारणासाठी दिली बलात्काराची धमकी, हत्या की आत्महत्या संशय वाढला
बार्शी – बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या या विवाहित माजी उपसरपंचाने स्वत:चाच जीव घेतला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
गोविंद जगन्नाथ बर्गे असे आत्महत्या केलेल्या विवाहित माजी उपसरपंचाचे नाव आहे. गोविंद बर्गे हे लोकनाट्य कला केंद्रात नियमित जात होते. त्यांना याची आवड होती. दीड वर्षांपूर्वी थापडीतांडा कला केंद्रामध्ये पूजा नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. हळहळू यांचा प्रवास पारगाव कला केंद्राकडे वळला. गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्रीच्या संबंधाचं रुपांतर प्रेमात झालं. गोविंदने तिला पावणे दोन लाखांचा मोबाइलही नर्तकीला भेट दिला होता. याशिवाय तो तिला नियमित दागिनेही देत होता. मात्र काही दिवसांपासून पूजा माजी उपसरपंचाशी फार बोलत नव्हती. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी सासुरे ता. बार्शी येथे गेला होता. पण तिने भेट नाकारल्याने गोविंद निराश झाला, आणि याच कारणामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोविंद हा नर्तिकेच्या गावी गेला होता. तिथे सासुरे गावातील परिसरात एका काळ्या रंगाच्या गाडीत त्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी या गाडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना काळ्या रंगाच्या गाडीत मृतावस्थेत गोविंद आढळून आला. तपास केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर तिथे त्यांना एक पिस्तूल देखील आढळली आहे. जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्याविरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी गोविंदला दिल्याचं सांगितलं जात आहे. यातून गोविंदने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. आता गोविंदने आत्महत्या केली की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.
गोविंद जगन्नाथ बर्गे हे गेवराई तालुक्यातील लुखा मसला गावचे माजी उपसरपंच होते. ते गावातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात होते. शिवाय ते प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. त्यांच्या व्यवसायाला चांगला जम बसला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.