
भयंकर! प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
हत्या करून रचला अपघाताचा बनाव, या कारणामुळे झाला भांडाफोड, प्रेमविवाह होऊनही नेहाने केली पतीची हत्या, नेमके कारण काय?
महाराजगंज – देशात विवाहबाह्य संबंधांतून हत्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता महिला सुद्धा यात मागे नसून प्रियकरासाठी पतीची हत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना यूपीमधून समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे पत्नीने प्रियकरासाठी पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नागेश्वर रौनियार असे हत्या करण्यात आलेल्या पतिचे नाव आहे. पोलिसांनी नेहा रौनियार आणि तिचा प्रियकर जितेंद्र यांची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि नागेश्वर यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, नेहा मूळची नेपाळची आहे. पण लग्नानंतर काही दिवसात नेहाच्या गावातील जितेंद्र सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. जितेंद्र हा नेहापेक्षा सहा वर्षांनी लहान होता. पण जितेंद्र सोबत प्रेमसबंध तयार झाल्यानंतर नागेश्वर आणि नेहामध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे नेहा वेगळी राहू लागली. पण नागेश्वर तिची सतत समजूत काढत होता. पण नेहाला जितेंद्र सोबत राहायचे होते, त्यामुळे त्यांनी नागेश्वरची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबरला नागेश्वरला जितेंद्रच्या भाड्याच्या खोलीत बोलावून प्रथम दारू पाजली. नंतर त्याच्या नशेचा फायदा घेत हातपाय बांधून गळा दाबून हत्या केली. गुन्ह्यानंतर नागेश्वरची हत्या अपघात वाटावा यासाठी नेहाने मृतदेह दुचाकीवर ठेवून रस्त्यावर फेकून दिला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना दमकी गावाजवळ रस्त्यावर एक मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे निदान झाले. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात नेहाच्या जितेंद्र सोबत सबंध असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तेव्हा दोघानी खून केल्याची कबुली दिली, पण नेहाने पतीनेच आपला नंबर जितेंद्रला दिला होता, आणि त्यानेच आपल्याला जितेंद्र सोबत बोलायला भाग पाडले, असा आरोप केला आहे.
पोलिस अधीक्षक सोमेंद्र मीणा यांनी सांगितले की, नागेश्वरचा खून पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. तपासात सर्व पुरावे समोर आल्याने नेहा आणि जितेंद्र यांना अटक करण्यात आली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे, पोलीस अधिक तपास करत आहे.