
या महत्वाच्या कागदामुळे डान्सर पूजा गायकवाड पुरती अडकणार
गोविंद बर्गे हत्या प्रकणात पुन्हा एकदा नवीन खुलासा, पुजाचा भाऊ आणि मावशीबाबत मोठा खुलासा, तो व्हिडिओ देखील चर्चेत
बार्शी – लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. पण या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तिने बार्शी परिसरात बर्गे यांच्या पैशांतून पावणे दोन गुंठे जमीन घेतल्याची माहिती समोर आली होती. या जमीन खरेदीखतावर साक्षीदार म्हणून पूजाच्या भावाने सही केल्याचे देखील समोर आले आहे. आता तिच्या मावशीच्या नावावर काही दिवसांपूर्वी वैराग परिसरातील तीन एकर जमीन खरेदी केल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पूजा ही लहानपणापासूनच आपल्या मावशीकडे राहायला होती. मावशीने तिचं पालन पोषण केलं. त्यामुळे लहानपणापासून आधार देणाऱ्या मावशीसाठी पूजाने गोविंद बर्गेची आर्थिक लूट केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या जमिनीच्या मूळ मालकाचीही चौकशी केली आहे. बार्शी पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. तसेच गोविंद यांच्या मृत्यूनंतर पूजाचा एक रिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आठवडाभरापूर्वी तिनं हा रिल शेअर केला होता. या इन्स्टा रिलमध्ये पुजाच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहे. तसेच तिच्या हातात पाचशेची करकरीत नोट दिसत आहे. रिलमध्ये ती एका डायलॉगची लिप्सिंग करत आहे. ‘मला या माणसाची विचित्र सवय लागलीय. माझ्यातून कायमचा गेला तर, माझं फार अवघड होईल’, या ऑडिओवर पूजा लिप्सिंग करताना दिसत आहे. आता पोलीस या व्हिडिओचा आणि आत्महत्या याचा काही सबंध आहे का? याचा तपास करत आहेत.
गोविंद बर्गेच्या आत्महत्येनंतर मेहुण्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पूजाला आता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पूजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.