
अभिनेत्रींच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काऊंटर
गोळीबार करणारे दोन्ही शूटर ठार, या टोळीचे नाव घेत केली होती फायरिंग, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
मुख्य – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबत झालेल्या चकमकीत दोघेही जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. आरोपी रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. एसटीएफ पथकाने घटनास्थळावरून एक ग्लॉक, एक जिगाना पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. १२ सप्टेंबर रोजी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बरेलीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिशा पटानी हिच्या कुटुंबाच्या घराबाहेर ८ ते १० राउंड गोळीबार केला होता. या घटनेनंतर दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी (निवृत्त डीएसपी) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले होते. अधिकाऱ्यांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. १२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:४५ वाजता घडली. बरेलीतील दिशाच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराच्या वेळी दिशा पटानीचे वडील, आई आणि बहिण घरात उपस्थित होते. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या प्रकरणी बरेली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कारवाईनंतर दिशाचे वडील जगदीश पटानी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “इतक्या कमी वेळेत कठोर पावले उचलून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.