Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोच्या जुन्या प्रियकराकडून नवऱ्याला बेदम मारहाण

भरदिवसा मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न, मारहाण आणि अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद, अशी केली सुटका, नेमकं काय घडलं?

नाशिक – नाशिकमध्ये भरदिवसा अपहरण आणि मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या जुन्या प्रियकरणेच हे अपहरण केले होते. याचा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तेजस ज्ञानेश्वर घाडगे असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तेजस ज्ञानेश्वर घाडगे हे हिंद सोसायटीसमोर एका दुकानात त्याचा मित्र सौरभ आहेर व त्याचे वडील यांच्यासोबत चहा पीत होता. त्यावेळी घाडगे याच्या पत्नीचा लग्नाआधी प्रेम संबंध असलेला संशयित प्रियकर गिरीश शिंगोटे याचा मित्र शैलेश कुवर ऊर्फ बंटी ,अक्षय पवार व त्याचे काही मित्र तिथे आले आणि त्यांनी घाडगेला बेदम मारहाण करत पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीत बळजबरीने बसवत अपहरण केले. पण पुढे काही अंतरावर सदर गाडीतून तेजस यांनी जीव वाचवण्यासाठी उडी घेतली आणि रिक्षाच्या साहाय्याने पपया नर्सरी, सातपूर येथील पोलिस चौकी गाठून येथील पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली. गिरीश शिंगोटे यानेच त्याच्या मित्रांसमवेत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची तक्रार तेजस घाडगे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

 

पोलिसांकडून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गिरीश शिंगोटे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जुन्या प्रेमसंबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!