
पूजा दोन दिवस त्या ठिकाणी गेली आणि मगच तिने बलात्काराची धमकी दिली
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा, त्या दोन दिवसात काय घडले, त्या कला केंद्राबाबत मोठा निर्णय, चॅटमुळे पूजा अडचणीत
बार्शी – बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस गाजत चालली आहे. या प्रकरणात कलाकेंद्रात नृत्य करणारी पूजा गायकवाड सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून पोलिस तिची सखोल चौकशी करत आहेत. आता यात आणखीन नवे खुलासे समोर आले आहेत.
गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पूजा बर्गे हिच्याशी प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला सोन्याचे दागिने करुन दिले होते. तिच्या भावाला महागडा मोबाईल आणि बुलेट गाडी घेऊन दिली होती. एवढेच नव्हे गोविंद बर्गे यांनी पूजाच्या सांगण्यावरुन तिच्या नातेवाईकांना पैसे आणि त्यांच्या नावावर जमीन करुन दिली होती. एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला होता. पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल मधून पोलिसांसमोर नवीन नवीन खुलासे आले समोर आहे. पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग येथे वेगवेगळ्या लॉज आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडच्या केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. आपण गोविंदसोबत प्रेमसंबंधात होतो, अशी कबुलीही पूजाने दिली आहे. गोविंद बर्गे याने पूजा गायकवाड हिला गेवराईतील नवीन बंगला बघण्यासाठी बोलावले होते. हा बंगला पूजाला खूप आवडला होता. तिने दोन दिवस तिकडेच मुक्काम केला होता. यानंतर पूजाने हा बंगला माझ्या नावावर करा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे पूजाने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद बर्गे यांना दिली होती. पूजा आणि गोविंदमध्ये २०२४ प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की, आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते. त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घरखर्च पाहायचा. त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते. दरम्यान, गोविंदच्या मृत्यूप्रकरणी नर्तकी पूजावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाने प्रकाशझोतात आलेल्या धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.