
महिला पोलीस उपनिरीक्षकाची तक्रारदाराला शिवीगाळ
बॅचही फेकून मारला, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, पोलिसांचा वेगळाच दावा, नेमकं काय घडलं?
मुंबई – मुंबईतल्या व्हीपी रोड पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तक्रार नोंदवायला आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारासोबत वाद झाल्यानंतर तिथे कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षकाने महिलेला बॅच फेकून मारला आहे.
पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे रागाच्या भरात त्यांच्या पोलीस गणवेशाला असलेली नेमप्लेट काढली आणि तक्रारदारावर फेकली आहे. एका महिला फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. यावेळी महिला पोलिस खर्डे यांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे तक्रारदार महिलने महिला पोलिसाला जाब विचारला. यावर महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे चांगल्याच आक्रमक झाल्या. यावेळी तक्रारदार महिलेने पोलीस महिलेला नाव विचारले असता तिला वर्दीवरील नेम प्लेट आणि बॅच फेकून मारली. पण सुदैवाने ती प्लेट महिलेच्या डोळ्याजवळून गेली. कर प्लेटची पिन महिलेच्या डोळ्यात गेली असती तर महिलेला गंभीर दुखापत झाली असती. दरम्यान खर्डे यांनी तक्रारदार महिलेला बाहेर काढ नाहीतर हिला मारेन मी अशी धमकी देते. तसंच हरामी साल्या अशी शिवीही दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पोहचल्यावर नागरिकांमध्ये संताप वाढला असून त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या या आक्षेपार्ह वर्तनामुळे पोलिस प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, करांडेने मुद्दाम खर्डे यांच्या चेहऱ्यावर मोबाईल कॅमेरा फोकस केला आणि सतत रेकॉर्डिंग करत राहिला. यामुळे खर्डे यांना अपमानास्पद आणि अस्वस्थ वाटल्याने त्यांनी चिडून नावपट्टी काढून फेकली. हा प्रकार करांडेनं सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी पेटला. अखेर या प्रकरणाची चौकशी गिरगाव विभागाचे एसीपी ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
यशच्या माहितीनुसार व्हीपी रोड पोलिस स्टेशनमध्ये गेले असताना पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी शिवीगाळ केली. तिने यशच्या मित्राच्या चेहऱ्यावर तिचा बॅच फेकला आणि एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. वैयक्तिक कारणे सांगून व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करू नये अशी विनंती केली.