
धक्कादायक! चाकूने प्रेयसीची हत्या प्रियकरचीही आत्महत्या
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, दोन वर्षापासूनचे प्रेमसंबंध आणि ते हॉटेल, प्रेयसीच्या नावामुळे मोठा ट्वीस्ट, काय घडले?
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री प्रेमी युगलाचा भयानक शेवट झाला आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. पण यात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला होता.
साहिल उर्फ सोनू राजपूत आणि ऋतुजा पद्माकर खरात अशी भीषण अंत झालेल्या प्रेमी व प्रेयसीची नावे आहे. खामगाव शहरातील सजनपुरी येथील जुगनू हॉटेलमध्ये काल मंगळवारी रात्री उशिरा हे थरारक हत्याकांड घडले. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने ज्या नावाने मुलीचे नाव जाहीर केलं होतं, ते खोटं निघालं असून मयत मुलीचं खरं नाव ऋतुजा पद्माकर खरात आहे. ती साखरखेर्डा येथील शिंदी गावातील रहिवासी होती. धक्कादायक म्हणजे ऋतुजाने खोटं आधार कार्ड देत या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला होता. ऋतुजा खरात ही खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षाचं शिक्षण घेत होती. तिचे साहिल बरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या हॉटेलमध्ये ते यापूर्वी आठ वेळा आले असल्याचीही रजिस्टरवर नोंद आहे. हे प्रेमीयुगुल खामगावजवळील सजनपुरी येथील हॉटेल जुगनूमध्ये थांबले होते. दरम्यान, काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती आहे. यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने भोसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीची निर्घृण हत्या केल्या नंतर सोनू राजपूत यानेदेखील त्याच चाकूने स्वतःला भोसकून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाबाबत बोलताना खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील म्हणाले की, प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःला धारदार शस्त्राने भोसकून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी तपासात समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने खामगाव हादरले असून याची चर्चा होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.