Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय

आरोपींचे धाबे दणाणले, हगवणे कुटुंबाचा पाय आणखी खोलात, न्यायालय म्हणाले नऊ महिन्यांच्या बाळाची आई.....

पुणे – हुंडाबळीच्या गंभीर प्रकारामुळे अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात एकूण ११ आरोपींविरुद्ध १६७० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. आता न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने ॲड. विपुल दुशिंग यांच्या मार्फत न्यायालयात जमीन अर्ज केला होता. पण दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे,आणि नीलेश रामचंद्र चव्हाण अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावं आहेत. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांच्या सासु, नणंद आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे. आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, कट कारस्थान रचणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामीनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील शिवम निंबाळकर यांनी जामीनाला तीव्र विरोध केला. ‘शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या, ज्यावरून ११ ते १६ मे दरम्यान तिचा क्रूर छळ झाल्याचे सिद्ध होते. आरोपी नीलेश चव्हाण हा हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थित होता आणि त्याने शशांक व करिश्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट केले. कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेश यांच्यातील निकटचे संबंध दिसून येतात’, ही माहिती त्यांनी न्यायालयात सादर केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.

सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. यानंतर हगवणे कुटुंबीयांचे राजकीय लागेबांधे, पोलिसांवर असलेला प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमीबद्दल माहिती समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे तसेच सासू, नणंद व आरोपी निलेश चव्हाणलाही अटक केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!