Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर! क्रूर सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण

आजीला वाचवण्यासाठी चिमुकल्या नातवाची धडपड, तरीही सुनेची क्रूरता थांबेना, व्हिडिओ पाहून तुम्हलाही संताप येईल

इटावा – उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भरथना भागात एका सुनेने तिच्या वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान चिमुकला आजीला वाचवण्यासाठी आईकडे विनवणी करत होता तरीदेखील सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे.

अनेक घरात सासू आणि सुनेचे वाद नवीन नाहीत. अगोदर सासू सुनेला मारहाण करत असल्याचा अनेक घटना समोर आल्या होत्या. पण आता सून सासूला मारहाण करत असल्याचा घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना इटावामधून समोर आली आहे. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इटावा जिल्ह्यातील भरथाना भागात सून सासूला बेदम मारहाण करत आहे. तर शेजारी तिचा लहान मुलगा मात्र आई नको मारू आजीला सोडून दे म्हणत आहे. पण तरीदेखील सासूला ती सून मारहाण करतच राहिली. तो चिमुकला रडत आईला मारू नको म्हणत असतानाही सून मारतच होती. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कमाल म्हणजे सुनेने तिच्या सासूविरुद्ध याआधी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी सुनेची क्रूरता आणि निष्पाप मुलाचे ओरडणे अनेकांना हादरवून टाकणारे आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीशचंद्र यांनी सांगितले की, भरठाणा पोलीस ठाण्याशी संबंधित एक व्हिडिओ प्राप्त झाला आहे, ज्याची दखल घेण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या वृद्ध सासूला मारहाण करत आहे. या संदर्भात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!