
बायकोने नवऱ्याचे लफडे पकडले आणि मग दे दणादण धुलाई
पती पत्नी आणि वो चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पत्नीने पतीच्या प्रेयसीला रस्त्यावरच चोपले, नेमकं काय घडलं?
मुंबई – अलीकडे समाजात अनैतिक संबंधाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुरुषाबरोबर आता महिलादेखील यात मागे नाहीत. यामुळे अनेक ठिकाणी खून सुद्धा करण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार देखील तुटले आहेत. आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो मुद्दा चर्चेत आला आहे.
विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. पत्नीला धोका देऊन पतीनं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर समोर आल्यानंतर पत्नीने पती आणि दुसऱ्या महिलेची चांगलीच धुलाई केली आहे. एक व्हिडीओ इंटरनेटवर नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडते आणि भर रस्त्यात त्याची धुलाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती दुसऱ्या महिलेसोबत भर रस्त्यात बोलत असतो. त्याचदरम्यान, त्या व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी येते आणि त्या महिलेला थप्पड मारते. महिलेचा पती तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेल्या महिलेनं नवऱ्यालाही चोप देण्याचा प्रयत्न करते. यावेळी त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. रस्त्यात दोन महिला आणि एक पुरुषामध्ये झालेला राडा कोणीतरी कॅमेरात कैद केला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि व्हिडीओत असणारे लोक कोण आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही पण हा बंगालच्या भागातील असल्याचे तेथील भागावरून दिसत आहे.
हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात लोकांकडून सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्या स्त्रीच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काहींना नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या एका घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे की विवाहबाह्य संबंध कसे सामान्य होत आहेत, हे समोर आले आहे.