Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रियकरासाठी पत्नीने पतीलाच संपवले, फोन केला आणि…

पतीच्या मित्रासोबतच अनैतिक संबंध, पतीला संशय आला आणि तिथेच कट रचला, पण प्राची काशी सापडली

गाझियाबाद – प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढल. गाजियाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या पत्नीसह ५ आरोपींना अटक केली आहे.

प्राची असं पत्नीचं नाव असून रिहान हे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. आसिफ आणि प्राचीच लग्न झालं होतं. तर रिहान हा आसिफचा जुना मित्र होता. मार्च २०२४ मध्ये आसिफ काही वादामुळे जेलमध्ये गेला. याच दरम्यान प्राची आणि रिहान यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल २०२५ मध्ये जेव्हा आसिफ जामिनावर घरी परतला तेव्हा त्याला प्राचीच्या बदललेल्या वागण्यावर संशय आला. त्याने तिला याबाबत विचारलं. पण प्राचीने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. तिने आपला मोबाईल देखील लपवला. शेवटी संतापलेल्या प्राचीने बॉयफ्रेंड रिहानला याबाबत सांगितलं. एकत्र राहायचं असेल तर आसिफचा काटा काढायचे निश्चित केले. आसिफला संपवण्यासाठी रिहानने प्राचीला विषारी औषध दिलं. खाण्याच्या पदार्थात हे औषध मिसळून पतीची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, हत्येचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. यावेळी, दोघांनी आसिफची हत्या करण्याचं ठरवलं. गाझियाबादच्या रफीकाबाद फाट्याजवळील झुडुंपाच्या मागे रिहान, बिलाल, जीशान, उवैश, गुलफाम आणि दानिश असे पाच लोक लपले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये पिस्तूल होतं. त्यावेळी, प्राचीने रिहानला फोन करुन आसिफ घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं. आसिफ त्याच्या स्कूटीवरून घरातून बाहेर पडला आणि तो रफीकाबाद फाट्याजवळ पोहोचताच गोळी झाडून त्याची हत्या केली. पोलिसांनी केवळ ४८ तासांतच या प्रकरणाचा खुलासा केला. तपासादरम्यान, कॉल डिटेल्स, लोकेशन, मॅसेजेस आणि इतर पुराव्यांच्या आधारे सत्य घटना समोर आली.

पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी रिहान, बिलाल, जीशान, उवैश आणि अरसी उर्फ प्राची यांना अटक केली. पोलिसांनुसार, मुख्य आरोपी रिहानवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे ४ गुन्हे, तर उवैशवर हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा आधीच दाखल आहे. इतर आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती गोळा केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!