
वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने केली प्रेयसीची निर्घृण हत्या
सहा वर्षाचे प्रेमसंबंध पण संशयाने केला घात, ज्या चाकूने केक कापला त्या चाकूनेच केली हत्या,पुण्यात काय घडतंय?
पुणे – प्रेमसंबंधातून संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या एका प्रियकराने वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांतच आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाकड येथील एका लॉजवर शनिवारच्या दुपारी उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मेरी तेलगू असे मृत प्रेयसीचे नाव आहे तर दिलावर सिंग असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर हळूहळू ही ओळख मैत्री आणि प्रेमात बदलली होती. मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती, तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांची मैत्री झाली, ज्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिलावरला मेरीवर संशय होता. मेरी त्रयस्थ व्यक्तीच्या प्रेमात पडली असल्याचा संशय त्याला होता, याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केले. १० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. दिलावरने तिचा वाढदिवस साजरा केला. परंतु नंतर या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या दिलावरने चाकू आणि ब्लेडने तिच्यावर वार करत तिची हत्या केली. ह्या हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली.
काही वर्षांपूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. तिथूनच त्यांची मैत्री झाली आणि नंतर तिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यामुळे सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत.