Latest Marathi News
Ganesh J GIF

हे अतिशय घातक इंजेक्शन देऊन केली डॉक्टर पत्नीची हत्या

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा डॉक्टर पतीने या कारणासाठी केली पत्नीची हत्या, दोघांत नेमकं काय घडलं?

बंगळुरू – कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं डॉक्टर कृतिका एम रेड्डी हिच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे. या प्रकरणात तिचा पती आणि व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉ. महेंद्र रेड्डी याला अटक करण्यात आली आहे. घातक इंजेक्शन देऊन त्याने पत्नीची हत्या केली.

महेंद्र आणि २८ वर्षीय कृतिका यांचा विवाह गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला होता. डॉक्टर महेंद्र यांची पत्नी कृतिका एम. रेड्डी या देखील डॉक्टर होत्या. त्या व्यवसायाने डर्मेटॉलॉजिस्ट होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये अचानक कृतिकाचा मृत्यू झाला. त्या गॅसच्या आजाराने त्रस्त होत्या आणि डॉक्टर महेंद्रच त्यांच्यावर उपचार करत होते. तेव्हा सर्वांना असे वाटले की आजारानेच कृतिकाचा जीव घेतला आहे. पण पोस्टमोटम मधून धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर अनेक धक्कादायक खुलासे झालेत. सीन ऑफ क्राइम (SOCO) टीमने घटनास्थळाची तपासणी केली असता धक्कादायक पुरावे सापडले. घटनास्थळावरून कॅन्युला सेट, इंजेक्शन ट्यूब आणि इतर वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली. ही उपकरणे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी मृत डॉ. कृतिका यांच्या व्हिसेरा नमुना देखील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला.कृतीकाला प्रोपोफोल नावाचे एक शक्तिशाली भूल देणारे औषध असल्याचे आढळून आले. जे नियमित वैद्यकीय उपचारांमध्ये दिले जात नाही. यामुळे तिच्या डॉक्टर पतीचा संशय आणखी वाढला.  महेंद्र रेड्डी लग्नापासूनच त्यांच्या पत्नीकडे दुर्लक्ष करत होते. त्यांना एक रुग्णालय बांधायचे होते आणि त्यांनी त्यांच्या सासरच्यांनी पैसे द्यावे, अशी त्याची मागणी होती. ती पूर्ण न झाल्यामुळे त्याने आपल्या मुलीची हत्या केली असा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे ज्ञानाचा चुकीचा जीवघेणा वापर हा मुद्दा समोर आला आहे.

महेंद्र यांनी याआधीही काही गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर फसवणूक आणि धमकी देण्यासारखे अनेक गुन्हे आधीपासून नोंदवलेले आहेत. आता पोलिसांनी या केसमध्ये हत्येच्या कलमांचाही समावेश केला आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या सांगण्यावरून या केसची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली होती. आता यात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!