
नागपूर दि १(प्रतिनिधी) – नमाज अदा करून असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमधुन समोर आला आहे. जाफर नगर मशिदीत ही घटना घडली आहे. या मशिदीत एक व्यक्ती नमाज अदा करीत होता. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नागपूरात मृत झालेला व्यक्ती अकोला जिल्ह्यातील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता. आजारावरील उपचारासाठी तो नागपूरला आला होता.त्यासाठी तो आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत होता. श्र घटनेच्या दिवशी गुरुवारी नमाज अदा करीत असताना तो अचानक खाली कोसळला, आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. तो कोसळल्यानंतर अनेकजण धावले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.घडलेला हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.