चाकण दि ८(प्रतिनिधी) – दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज तर अपघातवार आहे की काय अशा घटना घडत आहेत नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकणमधील आंबेठाण चौकात दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला एका मालवाहू पिकअपने मागून धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात घडला.अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संतोष पाचरणे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात महामार्गाजवळ संतोष आपल्या दुचाकीसह उभा होता. पण अचानक मालवाहू पिकअप गाडीने मागून येऊन. जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की संतोष हवेत उडाला. अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अलीकडे रस्ते अपघाताचे अनेकदा रस्त्यावरुन जाताना वाहने अतिशय सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, रस्त्यावर मृत्यू कसा, कधी आणि कुठून अंगावर येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. नाशिक महामार्गावर घडलेल्या अपघाताचा व्हिडीओही तसाच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.