Latest Marathi News
Ganesh J GIF

सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने केले जेरबंद, सविस्तर बातमी बघा…!

पुणे शहर प्रतिनिधी – पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशान्वये वाहन चोरीच्या अनुषंगाने युनिट 2 चे स्टाफ पेट्रोलींग करीत असताना युनिट २ कडील पोलीस अंमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , पुण्यामध्ये येऊन वाहने चोरणारा शिक्रापुर येथील चव्हाण कॉम्पलेक्सचे बाजुला भुजबळ चाळ येथे भगवान मुंडे नावाचा एक इसम रहात असुन त्याचे जवळ वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी गाड्या असुन सदर गाड्या संशयास्पद आहे अशी खात्रीशीर खबर मिळताच सदरची खबर युनिट -२ प्रभारी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना कळविली असता त्यांनी सदर बाबत खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिक्रापुर येथे तपासकामी बातमीचे ठिकाणी जावुन गुप्तपणे पाहणी केली असता बातमीप्रमाणे एक इसम संशयास्पद रित्या अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम एच १२ पी ई ६४९४ हिचेवर बसलेला दिसला. त्यानंतर बातमीप्रमाणे खात्री होताच आम्ही वरील स्टाफचे मदतीने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव भगवान राजाराम मुंडे वय ३२ धंदा सिक्युरेटी व्यवसाय रापरभणी सध्या रा.भुजबळ चाळ चव्हाण, कॉम्पलेक्स शेजारी शिक्रापुर, असे सांगीतले . त्यास विश्वासात घेवून त्याचे ताब्यातील अॅक्टीव्हा गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने अॅक्टीव्हा गाडी कमान हॉस्पीटल , वानवडी पुणे येथुन सुमारे १५/२० दिवसापुर्वी गाडी चोरी केल्याचे सांगितले .त्यानंतर सदर गाडीची डिक्की उडघुन पाहता त्याचे डिक्कीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे दोन मोबाईल फोन मिळुन आले सदर अॅक्टीव्हा तसेच मोबाईल फोन ताब्यातील इसमाने चोरी करुन आणले असल्याची दाट शक्यता वाटत असल्याने अधिक तपास केले असता आरोपीकडे 8 दुचाकी, 2 मोबाईल असा एकूण २,८२,००० / – रु मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१ ) वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक २३३/२०२२ भा व वि कलम ३७ ९ अन्वये ऍक्टिवा दुचाकी गुन्हा उघडकिस आणला आहे

2) लष्कर पोलीस स्टेशल गुन्हा रजि क्रमांक ५ ९ / २०२२ भा व वि कलम ३७ ९ अन्वये पॅशन प्रो दुचाकी गुन्हा उघडकिस आणला आहे.

३ ) पुणे रेल्वे पोलीस स्टेशन रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक १५१ / २०२२ भा व वि कलम ३ ९ २ मध्ये पाहिजे आरोपी आहे

४ ) नादेड रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ५५५/२०२१ भा द वि कलम ३९२ मध्ये पाहिजे आरोपी आहे

तपासात निष्पन्न झालेले व सदर आरोपी याचेकडुन जप्त करण्यात आलेले 8 मोटार सायकल व 2 मोबाईल फोन बाबत मुळ मालकांचा शोध घेत आहोत नमुद आरोपीस वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २३३ / २०२२ भा .द.वि. कलम ३७ ९ अन्वये वैदयकीय तपासणी करुन ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे टॉम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले,विशाल मोहिते पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे,पोलीस अंमलदार शंकर नेवसे, समीर पटेल,कादिर शेख, गणेश थोरात, गजानन सोनुने, संजय जाधव, विनोद चव्हाण, निखिल जाधव, साधना ताम्हाणे यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!