नाटू नाटूला ऑस्कर मिळताच ही पाकिस्तानी अभिनेत्री भारतात ट्रेंडिगवर
अभिनेत्री भारतातही लोकप्रिय, खासदारही करतात फॉलो, बघा का आली चर्चेत
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतात कधी कुठल्या व्यक्तिमत्त्व सर्च केले जाईल याचा भरवसा नाही. आता सध्या पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतात एकच चर्चा होत आहे. या अभिनेत्रीने ऑस्कर विनिंग गाण्यावर डान्स केला आणि तो तुफान व्हायरल झाला. तिच्या डान्सचा व्हिडिओ भारतातही चर्चेत आहे. ती अचानक सर्चिंग मध्ये टाॅपवर आली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटानं सिनेविश्वात धुमाकूळ घातला होता. नुकताच नाटू नाटू या गाण्याला आॅस्कर मिळाला आहे. भारतात हा चित्रपट चमकलाच पण आता पाकिस्तानमध्येही या चित्रपटाचा बोलबाला झाला. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्या गाण्याला आॅस्कर मिळाल्याने या अभिनेत्रीचा तो व्हिडिओ पुन्हा एकदा ट्रेंडिगवर आला आहे. हानिया पाकिस्तानसह भारतातही पॉप्युलर असून तिने आतापर्यंत अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केले आहे.सध्या हानिया ‘मुझे प्यार हुआ था’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. यातील गाणं ‘कहानी सुनो जुबानी सुनो’ भारतात हिट ठरले होते.एका लग्नसोहळ्यात आरआरआर चित्रपटातील लोकप्रिय गाणं नाटू नाटू डीजेवर लावण्यात आले होते. तिथे गाण्याचे बोल सुरु होताच हानिया आमिर भर लग्नमंडपात थिरकली होती. गोल्डन शरारा सूट घालून हानियाने उपस्थित सर्व पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतले होते. आजही सोशल मीडियावर अनेक लोक हानियाच्या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक करत आहेत. ती तिच्या इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करते. यातील बहुतांश पोस्ट या भारतीय चित्रपटांशी संबंधित असतात. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे तिला हानिया आमिरची इन्स्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोइंग आहे. भारतातून तिला उर्फी जावेद, खासदार नुसरत जहां, गायक बादशाह फॉलो करत आहेत.
हानिया शिक्षण घेत असताना तिने ‘जहान’ सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि तिला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. तेंव्हा ती पहिल्यांदा चर्चेत आली. तसेच टीव्ही सीरिअल ‘तितली’मधून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि याच शोमधून तिला मोठी ओळख मिळाली. ‘मेरे हमसफर’ या मालिकेमुळे ती भारतातही लोकप्रिय झाली.