पुणे दि ३(प्रतिनिधी)- आधीच वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
सीएनजी आणि पीएनजी गॅस दरवाढीबाबत महानगर गॅसने एक पत्रक जारी केले आहे. सीएनजी दरात करण्यात आलेली ही वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे.देशात गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम उत्पादन किमतीवर होत असल्यामुळे ही वाढ करण्यात आल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून सीएनजी कडे बघितले जात होते.पण आता काही शहरात सीएनजीचे दर हे पेट्रोल किंवा डिझेल पेक्षा जास्त झालेले आहेत.
राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर
नागपूर – ११६ रुपये
पुणे – ८५ रुपये
पिंपरी चिंचवड – ८५ रुपये
मुंबई ८० रुपये
नवी मुंबई – ८० रुपये
ठाणे – ८० रुपये
नाशिक – ६७.९० रुपये
धुळे – ६७.९० रुपये