Latest Marathi News
Ganesh J GIF

बाबा सिद्दीकीया प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट; सिद्दिकींच्या पोलीस सुरक्षा रक्षकाचं निलंबन, निलंबित कॉन्स्टेबलने सांगितले खरे कारण

 राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

प्राथमिक चौकशीत बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडून चूक झाल्याचं निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकी यानं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत एक निवेदन जारी केलं होतं. त्यांनी त्यामध्ये लिहिलं होतं की, “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवनाचं आणि त्यांच्या घरांचं रक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.”

झिशान सिद्गीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. या घटनेचे राजकारण करु नका. आम्हाला न्याय हवा, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते. आपल्या वडिलांवर गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता, त्याला काहीच कसे करता आले नाही, असा प्रश्न झिशान यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे. कॉन्स्टेबल शाम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचा दावा कॉन्स्टेबल सोनावणे यांनी केला होता.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!