पुणे प्रतिनिधी – मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा गाडीला धडक दिली त्यावर असणारा लहान मुलगा कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 रस्त्यावर पडला व या मुलाच्या आईसमोरच मुलाला डंपरने चिरडले व मुलगा जागीच ठार झाला, या घटनेच्या गांभीर्याने मुलाची आई टाहो फोडून रडत होती, या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डंपर चालकाने गाडी बाजुला लावून गाडी सोडून पळून गेला. या भयानक घटनेमुळे संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे मोठ मोठे लोठ उसळत होते. ज्या ठिकाणी डंपर पेटला होता त्याच्या वरती लाईटच्या तारा असल्याचे निदर्शनास आले व लाईट बंद केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
तारा मात्र जळुन खाक झाल्या. यानंतर हडपसर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी येताच त्यांनी अग्नीशमन गाडी बोलवून लागलेली आग विझवली. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह ससून मध्ये पाठविण्यात आला आहे. मंतरवाडी चौकात अशी घटना घडल्याने हाजारोंच्या संख्येने नागरीक त्या ठिकाणी जमले होते, हडपसर पोलिस प्रशासनाने सर्व परिस्थिती आटोक्यात आणली.