Latest Marathi News
Ganesh J GIF

मित्रानेच केला मित्राचा खून ; सोलापूरहून दोघांना अटक, खूनामागचे खरे कारण आले समोर

 दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच्या रागातून तरुणावर वार करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी सोलापूरहून दोघांना ताब्यात घेऊन १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हा केटरिंगचे काम करत होता. तो एकटाच रहात होता. त्याची बहिण संगीता कुलकर्णी ही त्याला फोन करत होती. परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला १९ सप्टेबर रोजी रात्री घरी पाठविले. तेव्हा त्या व्यक्तीला अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव लबडे याला हडपसर भागातून तर ज्ञानेश्वर सकट याला सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खूनामागचे कारण समोर आले.अमोल माने आणि वैभव लबडे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. अमोल हा वैभवला असलेल्या व्यसनाविषयी वेळोवेळी त्याच्या आईला व पत्नीला सांगत असे. त्यामुळे वैभव याचे त्याच्या आई व पत्नीबरोबर वाद होत होते. अमोल हा वेळोवेळी त्याच्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीला भडकवत असल्यामुळे वैभव याच्या मनात अमोलबाबत राग होता. या रागातूनच आरोपीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!