
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात वेळोवेळी घडला आहे.याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि.31 मे) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन परमेश्वर राजाभाऊ देडे (वय-21 रा. मोळे आळा, लोणी कालभोर, मुळ रा. नवीन रेणापुर नाका, आर्वी गायरान, लातुर) याच्यावर आयपीसी 366, 363, 376, 376(2)(एन), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीसोबत ओळख केली.मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर 1 मार्च रोजी मुलीला पळवून नेले.तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.