टोळक्याची एका व्यक्तीला लोडंखी राॅड आणि दांडक्याने मारहाण
मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद, या कारणामुळे झाली मारहाण
कल्याण – कल्याण पश्चिम भागात अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याच कल्याणमध्ये एक नवी घटना समोर आली आहे. कल्याणमधील काटेमानवली या ठिकाणी आठ ते दहा जणांच्या टोळीने घरात घुसून एका व्यक्तीला मारहाण केली आहे.
रमाशंकर दुबे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने रमाशंकर दुबे घरात घुसून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक टोळके रात्रीच्या वेळी तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी आणि हातात कोयता, लोखंडी रॉड किंवा लाकडी दांडके घेऊन एका घरात शिरताना दिसत आहे. या टोळक्याने रमाशंकर दुबे बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत रमाशंकर दुबे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुबे आणि त्यांच्या चुलत भावाचा गावातील जमिनीवरुन वाद आहे. याच वादातून २१ डिसेंबरच्या रात्री रमाशंकर यांना एका टोळीने लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या आणि कोयता घेऊन जात मारहाण केली. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली. हल्ला करणारे सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
प्रमुख आरोपी देखील जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत.” अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच लवकरात लवकर आऱोपींना पकडण्यात येईल असंही त्यांनी सांगितले आहे.