Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ट्रकने दुचाकीला चिरडले

अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अपघातात सुनेचा मृत्यू, सासरा जखमी, ट्रक चालक मद्यधुंद

पुणे – पुणे शहरात आज सकाळी एक भीषण अपघात घडली आहे. मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चाैकात एक ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

अपघातात दिपाली सोनी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी असे जखमीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडीला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड गंगाधाम या अत्यंत रहदारीच्या मार्गावरुन पन्नालाल आणि सोनी दोघेजण दुचाकीवरून जात होते. गंगाधाम चौकात आल्या नंतर सिंगल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार पन्नालाल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्पायरल हॉस्पिटल, गंगाधाम येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात कारणीभूत ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर गंगाधाम चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका संयुक्तपणे कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

गंगाधाम चौकात अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक पोलिसांनी वर्दळीच्या कालावधीत शहरात ट्रक, मिक्सर अशा अवजड वाहनांना बंदी केली आहे. तरीही हा ट्रक सकाळी गंगाधाम चौकात कसा आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!