Latest Marathi News
Ganesh J GIF

अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्न न केल्यास गोळ्या घालण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नगर शहरातील एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस तरुणाने हात धरून माझ्यासोबत लग्न न केल्यास बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.ही घटना (दि.२५) जुलै रोजी दुपारी शाळेत घडली.सचिन गोरक्षनाथ ससे (रा. ससेवाडी, जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२५ जुलै रोजी दुपारी चार वाजता मी वर्गात असताना सचिन ससे हा वर्गात आला. हात पकडून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे.

तू माझ्याबरोबर बाहेर चल, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या लग्नात येऊन बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.दरम्यान या संशयीत आरोपीने काही दिवसापूर्वीही या मुलीला त्रास दिला होता. मात्र काही प्रतिष्ठितांनी मध्यस्ती करत त्याला समज देत हे प्रकरण मिटवले होते. मात्र त्याने पुन्हा त्रास दिल्याने त्याच्यावर पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!