घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न पण घडल वेगळंच?
भंडा-यातील त्या घटनेत राष्ट्रवादीच्या नेत्यावरही गुन्हा दाखल
भंडारा दि २७ (प्रतिनिधी) – सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. पल्लवी प्रविण लांजेवार असे त्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचाही समावेश आहे. या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवीचे लग्न भंडा-यातील प्रविण लांजेवार सोबत २०१५ साली झाले होते. पण लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने २०१९ साली घटस्फोट घेतला. परंतू प्रवीणने माफी मागितल्याने २०२१ ला त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. पण पुन्हा एकदा तिच्या सासू-सासरे, नणंद आणि नवर्याने तिचा पुन्हा छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून तिने गळफास घेऊन जीवन संपवले. पल्लवीच्या माहेरकडील लोकांच्या तक्रारीवरून सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्यामध्ये पवनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेता लोमेष वैद्यचा समावेश आहे. पुढील तपास भंडारा पोलीस तपास करत आहेत.काडीमोड झाल्यावर पुन्हा त्याच्याशीच लग्न केलं. पण भयंकर घटना घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.