
अजित पवार गटाच्या दीपक मानकारांचा पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा; म्हणाले – ‘आम्हाला विचारलंही जात नाही’
राज्यपाल नियुक्त कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.पण परवा पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांचे नाव घेण्यात आले. जर पुणे शहराला एक जागा मिळाली असती तर कार्यकर्त्यांची ताकद वाढणार होती. मी मेरिट मध्ये कुठं कमी पडलो, तुम्ही दीपक मानकरला नाकारण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दीपक मानकर जे काय करतो पैसे न घेता करतो. मला पुढं पुढं करायची सवय नाही हे दादांना माहीत होतं, माझी स्पष्ट भूमिका आहे. आता राजीनामा देत आहे. मी कार्यकर्ता म्हणून अजितदादांबरोबर राहणार आहे. दीपक मानकर तुम्हाला संधी देऊ शकत नाही, असं त्यांनी कमीत कमी विचारायला पाहिजे होतं’, असे म्हणत दीपक मानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे