Latest Marathi News
Ganesh J GIF

धमाल! नवरीने नवरदेवाच्या वरातील केला भन्नाट डान्स

नवरीचा धमाकेदार व्हिडिओ व्हायरल, नवरदेवही लाजला, भवतीच्या त्या कृतीने पाहुणेमंडळीही चकित, एकदा बघाच!

पुणे – लग्नाचा सिझन संपला असला तरीही लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. कारण लग्न म्हणजे अनेक गमतीजमती या ठरलेल्याच असतात.

आजकाल तर लग्न म्हणजे एक इव्हेंटच बनला आहे. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. अलीकडे लग्नात डान्स ही अतिशय महत्वाची गोष्ट बनली आहे. विशेष म्हणजे प्रेम विवाहाला घरच्यांची मान्यता मिळाल्यानंतर होणारा आनंद सगळ्यात मोठा असतो. मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा या नात्याला प्रेमाचे कोंदण पहिल्यापासून असते. त्या नात्यावर अनेक गाणी देखील आली आहेत. सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच एका लग्नातील आहे. यात मामाची मुलीसोबत लग्न होत असल्यामुळे नवरा खूपच खुश आहे. खानदेशी तालावर दोघांनी भन्नाट डान्स केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर khandeshyt_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याने ,”नवरी भारी हौशी पाहून नवरदेवही लाजला असेल” अशा हटके कमेंट केल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!