
कमाल! लग्नात नंदेसमोर नव्या नवरीने केली अनोखी करामत
नव्या नवरीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नंदेसमोर वहिनीचे चॅलेंज बघाच!
मुंबई – सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातील काही मजेशीर, तर काही हृदयस्पर्शी असतात. विशेषतः नवरा- नवरी, दिर-वहीनी, नणंद-भावजय यांच्या डान्स व्हिडिओजना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असते.
लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होत आहे. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.सध्या असाच एक नणंद आणि वहिनीचा डान्स इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका लग्नात नणंद आणि वहिनीने एकत्र दिलेला भन्नाट डान्स सध्या तुफान व्हायरल होतो आहे. नणंद-वहिनीच्या जोडीचा डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. कारण दोघीही अगदी उत्साहाने आणि आनंदात नाचताना दिसत आहेत. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींनाच नव्हे, तर दोन कुटुंबांनाही जोडणारा क्षण. आणि हा क्षण खास आणि अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यात रंग भरत असतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर .swarupaaaaa. या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून, नेटकरीही त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अशी जोडी प्रत्येक घरात तयार व्हावी, अशी इच्छा नेटकरी व्यक्त करत आहेत.