
आणि अचानक भर मांडवात नवरी ढसाढसा रडली
नवरदेवाची ती कृती आणि नवरीच्या अश्रूंचा फुटला बांध, नातेवाईकही थक्क, बघा नक्की काय घडल?
मुंबई – सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावर विविध लग्नाचे सुंदर व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहुन डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाही
जोडीदार एकमेकांवर किती प्रेम करतात आणि जर पाहिलेले स्वप्न सत्यात उतरताना किती आनंद होत असतो, याची प्रचिती येत आहे. व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, वधू-वर लग्नमंडपात एकमेकांसमोर उभे असून वरमाला घालण्यासाठी तयार आहेत. मात्र, एकमेकांकडे पाहताच दोघेही अचानक भावूक होतात आणि रडू लागतात. यावेळी वधू वराच्या गळ्यात हार घालणार इतक्यात तो गुडघ्यावर बसतो आणि रडायला सुरुवात करतो. वधूदेखील त्याच्या गळ्यात हार घालताना रडू लागते. त्यांच्या आयुष्यातील हा अनमोल क्षण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील marathi_royal_karbhar या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला लाखो व्हिव्हज मिळाले आहेत. तर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहून अनेक लोक भावूक झाले आहेत. प्रेम, विश्वास आणि समर्पण याची सांगड झाल्यास निर्माण होणारी स्थिती शब्दात व्यक्त होत नाही तर ती आनंदाश्रूद्वारे समोर येते, याची प्रचीती करुन देणारा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.