Latest Marathi News
Ganesh J GIF

ससून रुग्णालयातील आणखी एक आर्थिक घोटाळा समोर ; २५ जणांच्या नावावर केले पैसे ट्रान्सफर; २५ जणांवर गुन्हा

 ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रकरण, पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकारामुळे नाचक्की झालेल्या ससून रुग्णालयातील आर्थिक घोटाळा आता समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या शासकीय बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या व इतर २३ शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा करुन तब्बल ४ कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोखपाल, लेखपाल यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील रुग्णालयातील १६ कर्मचारी आहेत.

याबाबत रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे (वय ५५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखपाल अनिल माने (वय५३), रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (वय ४५) यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान घडला आहे. रक्कम ट्रान्सफर केलेल्यांची नावे निलेश शिंदे (कक्ष सेवक), सचिन ससार (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), पुजा गराडे (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सुलक्षणा चाबुकस्वार (वरिष्ठ सहायक, रोखपाल), सुनंदा भोसले (आया, सेवानिवृत्त), सुमन वालकोळी (अधि. परिचारिका, ससून), अचृना अलोटकर (अधि. परिचारिका), मंजुशा जगताप (अधि. परिचारिका), दिपक वालकोटी (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सरिता शिर्के (खासगी व्यक्ती), संदेश पोटफोडे (खासगी व्यक्ती), अभिषेक भोसले (खासगी व्यक्ती), संतोष जोगदंड (वरिष्ठ लिपिक, ससून), दयाराम कछोटिया (शासकीय महाविद्यालय, बारामती), श्रीकांत श्रेष्ठ (कनिष्ठ लिपिक, ससून), भारती काळे (खासगी व्यक्ती), उत्तम जाधव (सेवानिवृत्त, सिटी स्कॅन तंत्रज्ञ), संदिप खरात (वैद्यकीय समाजसेवक, अधिक्षक, ससून), अनिता शिंदे (खासगी व्यक्ती), नंदिनी चांदेकर (अधि़ परिचारिका, ससून), सरिता अहिरे (खासगी व्यक्ती), शेखर कोलार (खासगी व्यक्ती), सरिता लहारे (अधि़ परिचारिका, ससून), राखी शहा (खासगी व्यक्ती) यांच्या बँक खात्यावर ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये जमा करण्यात आले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैर व्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ, यांच्यासह काही खासगी व्यक्तीचा सहभाग आहे. शासन आदेश, शासन मान्यता/ अधिष्ठाता यांची मान्यता नसताना परस्पर आहरण व सवितरण अधिकारी (डी डी ओ) यांच्या खात्यातील रक्कमा प्रशासकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ससून रुग्णालयातील १६ शासकीय कर्मचारी व इतर ८ खासगी व्यक्तींच्या खात्यात हस्तांतरीत करुन अपहार करुन शासनाची फसवणूक करण्यात आली. रुग्णालयातील आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ससून प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी केली़ या चौकशीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे तात्काळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!