
म्यानमार देशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन बेकायदेशीरपणे देहुरोड कॅम्पमध्ये राहणार्या चौघांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.शाहीद ऊर्फ सोहिद्दुल ऊर्फ स्माईली कालुस्लाम शेख, शाहीद इस्लाम (वय ३५, रा. एम बी कॅम्प, मदीना मजीद जवळ मुळ गाव राकाई शहर, बुथीदंग तुंगबजार, पोलीस ठाणे तुंगबाजार, म्यानमार), मुज्जमील मोहमद अमीन खान (वय ४३, रा. पंडित चाळ, गांधीनगर, देहूरोड, मुळ गाव नांगचंग, तहसील मगदू जि. रेकाँग, म्यानमार) यांना अटक करण्यात आली आहे.याबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पेरणेकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही जण २०१२ पासून पुण्यात रहात आहेत.त्यात एक जण सुपारीचा व्यवसाय करत आहे. कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय त्यांनी बेकायदेशीरपणे घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता.गेल्या १२ वर्षांपासून ते देहुरोडला रहात होते. त्यांच्याविषयी दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली.त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करीत आहेत.