Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती; राज्यातील ३० पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) –  राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे  यांची पोलीस अधीक्षक / दक्षता अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या पुढील प्रमाणे

अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, धाराशीव ते पोलीस अधीक्षक, सोलापूर, ग्रामीण) ,श्रीकृष्ण कोकाटे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, हिंगोली) ,सुधाकर पठारे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा) ,अनुराग जैन (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक, वर्धा) ,विश्व पानसरे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलीस अधीक्षक, बुलढाणा, सुनिल कडासने यांच्या निवृत्तीने रिक्त होणार्‍या पदावर) , शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक, सोलापूर, ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे), संजय जाधव (अपर पोलीस अधीक्षक, बारामती ते पोलीस अधीक्षक, धाराशीव) ,  कुमार चिंता (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, यवतमाळ), आंचल दलाल (अपर पोलीस अधीक्षक, सातारा ते समादेशक, राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १ पुणे), नंदकुमार ठाकूर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), निलेश तांबे (अपर पोलीस अधीक्षक, नंदूरबार ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), पवन बनसोड (पोलीस अधीक्षक, यवतमाळ ते पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती), नुरुल हसन (पोलीस अधीक्षक, वर्धा ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्ऱ ११, नवी मुंबई), समीर अस्लम शेख (पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), अमोल तांबे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ते पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ), मनिष कलवानिया (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), अपर्णा गिते (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई)

दिगंबर प्रधान (पोलीस अधीक्षक/ दक्षता अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे ते पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर), पंकज नवनाथ शिरसाट (अपर पोलीस अधीक्षक, पालघर ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे (अपर पोलीस अधीक्षक, रायगड ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)रुपाली खैरमोडे (अंबुरे) (पोलीस उपायुक्त, ठाणे  शहर ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे (कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक,पालघर), अभिजित शिवथरे (सहायक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर ते पोलीस उपायुक्त, नागपूर), लक्ष्मीकांत पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य, मुंबई), विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त, नागपूर ते पोलीस उपायुक्त, मुंबई), वैशाली कडूकर (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते अपर पोलीस अधीक्षक, सातारा) ,दिपाली घाटे (अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई), सुरज गुरव (पोलीस अधीखक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग, मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक, नांदेड), सुहास शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा उपविभाग, जि़ गडचिरोली ते अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!