
गुगल जेमिनीवरून ट्रेंडिंग फोटो बनवत आहात का? मग सावधान
तरुणीने सांगितला भयानक अनुभव, म्हणाली माझा तो तिळ जेमिनीला कसा कळाला?, सतर्कतेचा सल्ला, नेमके काय घडले?
दिल्ली – सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोटो बनवण्याचा ट्रेंड आला आहे. कोणीही सोशल मीडिया उघडला तर सगळीकडे हेच फोटो दिसत आहेत. पण एका तरूणीला या बाबत एक धक्कादायक अभुनवला सामोरे जावे लागले आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.
झलक भवनानी नावाच्या तरुणीनं इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे आपण बनवत असलेले फोटो अँप किती सुरक्षित आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. झलक भवनानी नावाच्या तरुणीनं इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. गुगल जेमिनीच्या नॅनो बनानानं दिसत नसलेला तीळ फोटोत कसा दाखवला, याबद्दल झलकनं सांगितलं आहे. झलकने तिने ट्रेंडनुसार तिचा साडीतील एक फोटो तिने जेमिनीवर अपलोड केला आणि त्यानंतर तिला मिळालेल्या AI फोटोमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसून आली. ती म्हणाली, ‘जेमिनीला माझ्या शरीराच्या या भागावर तीळ आहे, हे कसे कळले? कारण मी पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातलेला फोटो अपलोड केला होता. ते तीळ दिसतही नव्हतं. मग तरी AIला हे कसं समजल. हे खूप भीतीदायक आणि घाबरवणारे आहे. असे कसे घडले, याची मला कल्पना नाही,’ अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे. तिने लोकांना सोशल मीडियावर किंवा AI प्लॅटफॉर्मवर काहीही अपलोड करताना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यानंतर नॅनो बनानाचा वापर करणाऱ्या असंख्य लोकांना प्रायव्हसीची चिंता वाटू लागली आहे. जेमिनीच्या नॅनो बनाना टूलनं तो फोटो कसा एडिट केला, ते अद्याप समजू शकलेलं नाही. झलकच्या पोस्टवर हजारो यूझर्नसी कमेंट केल्या आहेत.
काही युजरनी कमेंटमध्ये त्याच्यासोबत घडलेला असाच काहीसा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. काही तज्ज्ञांनी याला ‘डिजिटल फूटप्रिंट’ असे म्हटले आहे, म्हणजे इंटरनेटवर तुम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती AI गोळा करत असते त्यामुळे फोटो क्रिएट करताना त्याला तुमच्याबद्दलची माहिती असते, असे सांगितले आहे.