Latest Marathi News
Ganesh J GIF

दांडिया खेळण्यावरून वाद ! वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणावर वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांवर गुन्हा दाखल

दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडविण्यास गेलेल्यावर टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आठ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वर दांडेली (वय ४२), मारुती गवंडी (वय ५८), ऋषिकेश दांडेली (वय २०), निखिल गवंडी (वय ३२), संतोष दांडेली (वय ४०), जावेद शेख (वय २३), अनिकेत अनगल (वय २५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बी. टी. कवडे रोडवरील शिव मित्र मंडळात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

यामध्ये आनंद देवेंद्र मांगले (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी शितल आनंद मांगले (वय ४३) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती दांडिया खेळण्यासाठी शिवमित्र मंडळ येथे गेले होते. यावेळी दांडिया खेळण्याच्या वादातून राजवर्धन नुगला यास मारुती गवंडी हा मारहाण करीत होता. ही भांडणे सोडविण्यासाठी आनंद मांगले गेले. तेव्हा आरोपींनी पूर्वीचा राग मनात धरुन फिर्यादीचे पती आनंद मांगले यांना मारहाण केली. ईश्वर दांडेली यांनी धारदार शस्त्राने आनंद यांच्या मानेच्या डाव्या बाजूला वार करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!